ghadamodi

सचिन धस १०

सचिन धस १०:भारताची अंडर-19 पुरुष क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिका मध्ये चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचली असून त्यात सचिन धस १० आपल्या खेळीने सगळ्याची मने जिंकत आहे.
खरंतर सचिन हे नाव क्रिकेट जगतासाठी काही नवीन नाही. आपल्या शानदार खेळीने सचिन तेंडुलकर याने भारतासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे.भारतात सचिनला क्रिकेटचा देव देखील म्हटले जाते.
पण सध्या वेगळ्याच सचिनची चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे. तो म्हणजे महाराष्ट्राचाच त्यातही मागास समजल्या जाणाऱ्या मराठवड्यातील बीडचा सचिन धस सध्या दक्षिण आफ्रिका मध्ये आपल्या खेळीने सगळ्याची मने जिंकत आहे.
स्पर्धेच्या सुरवाीपासूनच तो सातत्याने भारतासाठी खोऱ्याने धावा काढत आहे.त्यामध्ये नेपाळ विरुध्द ११६ धावांची खेळीचा प्रमुख समावेश असून त्यासाठी सचिनला सामना वीराचा देखील किताब मिळाला . तसेच ज्या खेळीमुळे तो प्रकाशझोतात आला त्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात ९६ धावांची खेळीचा यात समावेश आहे.
सचिन धस १०:बीड आहे मुळ गाव
सचिन हा मुळचा बीडचा.लहानपणापासूनच त्याला क्रिकेटचा भारी नाद. टीव्हीवर भारताची प्रत्येक मॅच तो आवर्जून पाहायचा.तसेच त्याच्या वडीलाला पण क्रिकेटचा भारी नाद. त्याचे वडील संजय धस यांची फार मोठी मेहनत सचिनला घडविण्यात आहे.आपला सचिन पण क्रिकेटपटू व्हावा,असे त्यांना नेहमी वाटायचे.प्रत्येक घरात असते तसेच सचिनच्या घरात पण वातावरण क्रिकेटसाठी आशादायक नव्हते. सचिनची आई सुरेखा धस यांना मात्र सचिनने काहीतरी दुसरे करावं,असे वाटायचे.सुरेखा धस या महाराष्ट्र पोलिस खात्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.सचिनला एक बहिण पण असून सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करते.सचिनला घडविण्यात त्याच्या आई – बाबा एवढेच त्याचे प्रशिक्षक अझहर शेख यांना जाते. साडेतीन – चार वर्षाचा असल्यापासूनच शेख सर त्याच्यावर काम करत आहेत.आपल्याला सचिन आणि आचरेकर सरांची जोडी माहीत आहे,यापुढे सचिन – शेख सरांची जोडी महाराष्ट्राला कळेल.पण रंजक माहिती म्हणजे ज्या सचिन तेंडुलकर वरून सचिन धस चे नाव ठेवण्यात आले असले तरी सचिन धस चा आवडता खेळाडू हा विराट कोहली आहे आणि संजय धस यांचा मात्र तेंडुलकरच आवडता खेळाडू आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या व महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा झालेल्या “महाराष्ट्र प्रिमिअर लीगमध्ये सचिनला खेळण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा सचिनने योग्य फायदा घेतला. सचिन महाराष्ट्र प्रिमिअर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्स संघाकडून खेळला. कोल्हापूर टस्कर्स संघात भारताचा स्टार खेळाडू तसेच आईपीएल मधून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेला पुण्याचा दिग्गज खेळाडू केदार जाधव याचा समावेश होता. आपण नेहमी पाहतो की ड्रेसिंग रूम मधले वातावरण अशा उदयोन्मुख खेळाडूंना कायम आकर्षित करते त्याप्रमाणेच सचिनला येथे केदार जाधव आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्कृष्ट खेळाडू अंकित बावणे यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत मॅच खेळण्याची संधी मिळाली. सचिन बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून त्याला इतरा प्रमाणे फारसे मित्र नाहीत. तो कोठे जाणे देखील पसंत करीत नाही. कोणाच्या वाढदिवसाला,लग्न समारंभाला,पार्टीसाठी अशा कोणत्याच सबबीखाली क्लास अथवा सरावाला दांडी मारत नाही. त्यामुळेच विश्वचषक सारख्या नामांकित स्पर्धेत काहीसा मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातून त्यातही बीड जिल्हयातून येऊन प्रतिनिधित्त्व आहे. व आपल्या जिल्हयाचे नाव करत मोठे करत आहे.
सचिन धस १०:कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य अतिशय महत्त्वाचे असते. त्याप्रमाणेच सचिन दररोज नेटमध्ये घाम गाळतो. व दररोज न चुकता सात तास सराव करतो. त्याची अचूकता एवढी असते की, समजा फटका खेळला नाही तर तो दिवस-दिवस एकाच प्रकारचे फटके खेळतो. एक-एक फटका हजार वेळा खेळून त्यातून परिपक्व होतो. अशातूनच आपल्या बॅटला धार मारून घेतो आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाची मग धार कमी करतो.

सचिन धस १०:१० सोबत विशेष नाते :

सचिन धस १०

सचिन धस १०:आपल्याला माहिती आहे की मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर हा १० क्रमांकाची जर्सी परिधान करतो. प्रत्येक खेळाडूसाठी आपली जर्सी ही विशेष असते. कारण कित्येकवेळा चाहते खेळाडूला आपल्या जर्सी क्रमांक वरुण ओळखतात. भारताच्या क्रिकेट टीम मध्ये अश्या प्रकारच्या जर्सी खूप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर (१०),विराट कोहली (१८),जसप्रीत बूमराह(९३),रवींद्र जाडेजा (८) या खेळाडूचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि सचिन धस यांचा जर्सी क्रमांक देखील १० आहे.

Exit mobile version