ghadamodi

आकाश दीप

खरतर राहिलेल्या तीन कसोटीसाठी जेंव्हा भारताचा संघ जाहीर झाला तेंव्हा सगळ्यांना अपेक्षा होती ती म्हणजे स्टार खेळाडू विराट कोहली खेळणार याची. परंतू जेंव्हा संघ जाहीर झाला तेंव्हा दोनच चर्चा सगळीकड पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे सर रवींद्र जाडेजा आणि के. एल. राहुल यांची झालेले पुनरागमन आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे भारताचा नवोदित खेळाडू आकाश दीप याची. आकाश दीप चा जन्म 15 डिसेंबर 1996 साली बिहारच्या ‘सासाराम’ मध्ये झाला. त्याला क्रिकेट खेळण्याची लहानपणापासूनच आवड राहिलेली होती . त्याचे वडील रामजी सिंग शहरातील एक्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

महेंद्रसिंघ धोनी प्रमाणेच खेळण्यासाठी त्याला सुद्धा बराच संघर्ष करावा लागला. त्याचे वडील रामजी सिंग व आई आणि त्याचे नातेवाईक या सगळ्यांनी आकाश दीप याच्या खेळण्याला विरोध केलेला. पण आकाश दीपची खेळव्याची इच्छा त्याला स्वथ बसू देत नव्हती आणि त्यासाठी कित्येक पापड बेलण्याची त्याची तयारी होती. आकाश दीप याची क्रिकेटमधील प्रगती वरचेवर वाढतच होती. आता तो त्याच्या बिहार राज्याकडून देखील खेळण्यास सज्ज होता- नेमकं याच वेळी एक वाईट घटना त्याच्यासोबत आणि समवयस्क असणाऱ्या खेळाडूसोबत घडली आणि ती म्हणजे बिहार क्रिकेट असोसिएशन व र काही कारणाने बंदी घालण्यात आली. आकाश दीप च्या करिअर च्या सुरुवातीलाच अशी घटना घडल्यामुळे तो व्यथित होता. त्याला पुढे काय करायचे हे समजत नव्हते. परंतू एखादी गोष्ट आपण मनापासून करतो त्याला फळ नक्की येते. म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग तेंव्हा असेच काहीसे आकाश दीप सोबत घडले त्याने पुढे पश्चिम बंगाल कडून खेळण्याचा निर्णय घेतला पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आकाश दीप याच्या वडीलाचे काही कारणाने निधन झाले काही महिन्यात त्याच्या भावाचे पण मृत्यू झाले व कुटुंबाची सर्व जबाबदारी ही आकाश दीपच्या खांद्यावर पडली .

आकाश दीप:कॅरियर

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा तरी मित्र असतो, जो त्याच्या सुःख दुखात सह‌भागी असतो. आकाश दीप याच्या एक्या जवळच्या मित्राने त्याला पश्चिम बंगालच्या दुर्गापुर शहरात एक्या क्रिकेट क्लब मध्ये सहभागी व्हायला मदत केली. मग पुढे आपल्या जादुई गोलंदाजीने त्याने फलंदाजाच्या त्रिफळा उडवायला सुरुवात केली. त्यावेळी महिन्याचे आकाश दीप 20,000 ते 25,000 रुपये कमवून आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागला. अशातच त्याच्या कारकिर्दीला एक वेगळेच वळण या काळात लागले. आपल्या स्वप्नाच्या दिशेने त्याने पुढचे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. आकाश दीप याने 2019 मध्ये BCCI ची नामांकित स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेत बंगाल कडून आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा सुरु केला. सय्यद मुश्ताक अली ही भारताची एक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. रणजी खेळत असलेल्या सर्व संघामध्ये याचे मॅचेस होतात. भारताचे पूर्व क्रिकेटर सय्यद मुश्ताक अली यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्याच नावाचा सन्मान करण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. त्यानंतर आकाश दीप याने विजय हजारे खेळून लिस्ट ए करिअरची सुरुवाल केली. आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात एक निर्णायक क्षण आला. तो म्हणजे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटू‌चे लक्ष असणाऱ्या रणजी चषक. रणजी चषक 2019-20 साठी त्याने बंगालसाठी 25 डिसेंबर 2019 प्रथम श्रेणी मध्ये पदार्पण केले. तसेच जगातील सर्वांत मोठी स्पर्धा असणाऱ्या अर्थात इंडियन क्रिकेट प्रिमिअर लीगअर्थात IPL मध्ये आकाश दीपला रॉयल चेलेंजर्स बैंगलोर या संघात घेतले होते.

आकाश दीप:कसोटी क्रिकेट

देशांतर्गत सामन्यामध्ये आकाशच्या मेहनतीचे बक्षीस म्हणून हे फळ मिळाले जिथे त्याने 2019 मध्ये पदार्पण केल्यापासून बंगालसाठी 29 सामन्यांत 103 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला योग्य कामगिरीचा फायदा झाला कारण त्याने 11 विकेट्स घेऊन प्रभावित केले. गेल्या महिन्यात इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यात त्याची कामगिरी उत्तम होती.

आकाश दीप :प्रतिक्रिया

“इनस्विंग ही माझी स्टॉक डिलिव्हरी आहे, परंतु या स्तरावर, तुमच्याकडे आउटस्विंग आणि रिव्हर्स स्विंग असणे आवश्यक आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्विंग नियंत्रित करणे आवश्यक आहे,” तो म्हणतो.  आकाश म्हणाला, “मी दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय संघात होतो आणि मला जाणवले की या स्तरावर कौशल्यापेक्षा, दबावाखाली योजना अंमलात आणणे हे मानसिक सामर्थ्य अधिक आहे,” आकाश म्हणाला.27 वर्षीय व्यक्तीला त्याच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर आढळते ज्याची त्याने नेहमी स्वतःसाठी कल्पना केली होती, परंतु या टप्प्यापर्यंतचा रस्ता खूपचखडकाळ होता.  जेव्हा तो 15 वर्षांचा होता आणि खेळ खेळण्याची आकांक्षा बाळगत होता, तेव्हा त्या तरुणासाठी बॅट किंवा चेंडू उचलण्याइतके आयुष्य सोपे नव्हते.”बिहारमध्ये त्यावेळी तेथे कोणतेही व्यासपीठ नव्हते आणि विशेषत: मी जिथून आलो होतो, त्या सासाराममध्ये क्रिकेट खेळणे हा गुन्हा होता.

आकाशच्या वडिलांना आशा होती की त्यांचा मुलगा पारंपरिक क्षेत्रात करिअर करेल. “बिहार पोलिस कॉन्स्टेबलच्या परीक्षेला बसा किंवा किमान राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्न करा, माझे वडील म्हणायचे. ते ते सरकारी नोकरीचे अर्ज भरतील आणि मी परीक्षेला जाईन आणि रिक्त फॉर्म सबमिट करून परत येईन. मध्ये. माझे मन, क्रिकेट ही माझी आवड असताना, मला फक्त आनंदी राहायचे होते आणि ते करिअर करण्याचा विचार कधीच केला नाही.”तथापि, सहा महिन्यांच्या कालावधीत शोकांतिकेने त्याचे आयुष्य बदलले. “माझे वडील आणि माझा भाऊ सहा महिन्यांतच मरण पावला. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, आणि प्रेरणा ही होती की मला कुटुंबाची काळजी घ्यावी लागली,” आकाश दीप म्हणाला.

Exit mobile version